लांजा | प्रतिनिधी
लांजा तालुक्यातील कोट पाष्टेवाडीत आई आणि मुलाच्या हत्याकांडाची घटना उघडकिस आली आहे. या दुहेरी हत्याकांडाने लांजा तालुक्यासह रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. नवऱ्यानेच आपल्या बायकोची आणि मुलाची हत्या केल्य़ाचा संशय़ पोलीसांनी व्यक्त केला आहे.
सोनाली चांदिवडे आणि प्रणव चांदिवडे अशी खून झालेल्या मायलेकांची नावे असून खून झालेला प्रणव हा अवघ्या सहा वर्षांचा बालक आहे. संदेश चांदिवडे असं संशयित आरोपीचं नाव आहे. याबाबतचा लांजा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथक वैद्यकीय अधिकारी तसेच श्वान पथकासह दाखल झाले आहे. घटना स्थळावरचा पंचनामा करण्यात येत आहे. माय लेकरांच्या खूनामुळे तालुक्यासह जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.