महसूल दिन सप्ताहानिमित्त आयोजन
मा. भारत निवडणूक आयोग यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यकम, २०२४ अंतर्गत व महसूल दिन सप्ताहाच्या अनुषंगाने तहसिलदार कार्यालय मालवण व स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे दिनांक – ०२ ऑगस्ट, २०२३ रोजी नवमतदार नोंदणी शिबिर तसेच मतदार जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर नवमतदार नोंदणी शिबिरामध्ये नवमतदार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून एकूण ८८ विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्यात आली. यावेळी व्यासपिठावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना नवमतदार नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन NSS विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एस.पी.खोबरे यांनी केले. यावेळी निवडणूक नायब तहसिलदार श्री. नागेश शिंदे, प्राध्यापक बी.एच.चौगुले, प्राध्यापक के.के. राबते, महसूल सहायक के.के. मांजरेकर, डाटा एन्ट्री ऑपरेटर पी.एन. नागवेकर व्यासपिठावर उपस्थित होते.









