मुंबई
बिकाजी फूडस् इंटरनॅशनल लिमिटेडचा समभाग बुधवारी तेजीत असताना दिसला. शेअरबाजारात कंपनीचा समभाग 5 टक्के वाढत बुधवारी 508 रुपयांवर पोहचत 52 आठवड्यानंतर उच्चांकी स्तर गाठण्यात कंपनीने यश मिळवले आहे. कंपनीने जून तिमाहीचा नफा जाहीर केला असून एकत्रित निव्वळ नफा 15 टक्के वाढीसह 481 कोटी रुपयांवर पोहचला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत हा नफा 418 कोटी रुपये इतका होता.









