सामाजिक बांधिलकीच्या टीमने सुखरूप काढलं बाहेर
भटवाडी येथील फ्लॅटच्या बेडरूममध्ये अडकलेल्या दोन वर्षाच्या मुलाला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले. सामाजिक क्षेत्रामध्ये सतर्क असलेल्या सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्याने काल भटवाडी येथील नक्षत्र बिल्डिंग फ्लॅटच्या बेडरूमच्या आतून दोन वर्षाच्या मुलाची सुखरूप सुटका केली . लहान मुलाने कडी घातली व मुलगा जोरजोराने रडू लागला . हा प्रकार त्या मुलाच्या आईच्या लक्षात येताच तिनेही आरडाओरड सुरू केली. सदर प्रकार पाहून शेजाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांना याची माहिती दिली असता सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर व शामराव हळदणकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थर्ड फ्लोर बाहेरून बिल्डिंगवर चढून मोठ्या कसरतीने बेडरूमच्या खिडकीचे ग्रील कापून खिडकीतून बेडरूम मध्ये प्रवेश केला व त्या मुलाला सुखरू बाहेर काढून पालकांच्या ताब्यात दिले. यावेळी सर्वांनी समाधान व्यक्त केले. सदर मुलगा जाम घाबरला होता. सामाजिक बांधिलकीच्या या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.









