सावंतवाडी : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेलच्या राज्याचे प्रमुख प्रा . प्रकाश सोनावणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या शिक्षक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा . बाळासाहेब नंदीहळ्ळी ( रा . सावंतवाडी ) यांची नेमणूक केली आहे. बी . आर नंदीहळ्ळी यांनी सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे उपप्राचार्य पदावर दीर्घकाळ सेवा दिली . सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख , माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत , साईनाथ चव्हाण , प्रांतिक सदस्य दिलीप नार्वेकर, तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर ,सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर , सेवादल अध्यक्ष तळवडेकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे .









