कांदा मार्केट येथील घटनेत लाखाचे नुकसान
बेळगाव : कांदा मार्केट येथील स्टेशनरी दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागून 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी घडली. तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र अधिक भडका उडण्याची शक्यता असल्यामुळे अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाचा बंब दाखल होऊन आग आटोक्यात आणली. कांदा मार्केट येथील पृथ्वी नॉव्हेल्टी या दुकानामध्ये अचानक शॉर्टसर्किटने आग लागली. छताने पेट घेतला. त्यानंतर साहित्यही जळाले. काहीजणांनी तातडीने पाण्याचा मारा केला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली. दुकान मालक विक्रमसिंग यांनी एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.









