दहशतवादी कनेक्शनवरून होतेय चौकशी
वृत्तसंस्था/ जालंधर
पंजाबमध्ये एनआरएने दहशतवादी कनेक्शनवरून मंगळवारी अनेक शहरांमध्ये छापे टाकले आहेत. पंजाबच्या मोगा येथील धूरकोट, बरनाला येथील पंधेर, जालंधरमधील दौलपुर आणि डल्लेवाल गावात एनआयएने ही कारवाई केली आहे. दहशतवादी आणि विदेशातून कारवाया करणाऱ्या गँगस्टर्ससोबत असलेल्य कनेक्शनवरून ही कारवाई करण्यात आली आहे. जालंधरच्या दौलपूरमध्ये अकाली दलाचा नेता असलेले मलकीत सिंह दौलतपूर यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. अशाचप्रकारे गुन्हेगारांच्या टोळीवरून एनआयएच्या पथकाने मोगा जिल्ह्यातील धूरकोटमधील जसविंद सिंहच्या घरी छापा टाकला आहे. जसविंदरची एनआयए अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे. डल्लेवाल गावातील लवशिंद्र सिंहच्या घरीही एनआयएने कारवाई केली आहे. लवशिंद्र हा यापूर्वी शीख स्टुडंट फेडरेशनचा नेता राहिला आहे.









