दुबईतून एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल झाल आहे. या व्हिडिओत एका रस्त्यावर अत्यंत मोठी हमर कार दिसून येत आहे. ही दुबईतील एका शेखची मॉडिफाय करविण्यात आलेली हमर कार असून ती आकाराने अत्यंत मोठी आहे. सामान्य हमरपेक्षा ही कार अनेक पटीने मोठी आहे. मास्सिमोच्या मायक्रो-ब्लॉगिंक साइटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत ‘हमजिला’ला एका महामार्गावर चालविताना दाखविण्यात आले आहे. विशाल वाहनासमोर उभ्या दोन कार्सना पाहून ही हमर प्रत्यक्षात किती मोठी आहे हे समजते. ही कार खरीखुरी असून दुबईच्या शेख हमद बिन हमदान अल नाहयान याचे मालक आहेत. त्यांना रेनबो शेख या नावाने देखील ओळखले जाते.
ही कार इतकी मोठी आहे की याच्या बाजूला उभे असणारे लोक याच्या टायरपेक्षाही लहान दिसून येतात. दुबईच्या रेनबो शेखची विशाल हम एच1 एक्स3 हमर 14 मीटर लांब, 6 मीटर रुंद आणि 5.8 मीटर उंचीची आहे. ही हमर रस्त्यावर चालविता येत असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले गेले आहे.
ही कार रेनबो शेखच्या 200 हून अधिक कार्सच्या कलेक्शनचा हिस्सा आहे. 20 दशलक्षाहून अधिक ह्यूजसोबत हमरच्या या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडविली आहे. अबूधाबीच्या शासक कुटुंबचे सदस्य असलेल्या शेख हमद बिन हमदान अल नाहयान यांच्याकडे विविध रंगांमधील 7 मर्सिडिज 500 एसईएल कार्स असल्याचे बोलले जाते.