मुंबई :
मनिलाँड्रिंग कायदाअंतर्गत चेअरमन पवन मुंजाल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्याच्या बातमीने हिरो मोटोकॉर्पचे समभाग मंगळवारी घसरणीत असताना दिसले आहेत. हिरो मोटोचे समभाग मंगळवारी इंट्रा डे दरम्यान 6.5 टक्के घसरणीसह 3243 रुपयांवर आले होते. कंपनीचे समभाग 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहचले होते. अंमलबजावणी संचालनालयाने पवन मुंजाल यांच्या घरी धाड टाकली असल्याचे समजते. ज्याचा परिणाम समभागावर नकारात्मक दिसून आला.









