सदरच्या ‘बुक’ची किंमत 16,499 रुपये राहणार : विविध वैशिष्ट्यो समाविष्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिलायन्स जिओने नुकताच भारतात आपला नवीन जिओ बुक लॅपटॉप लॉन्च केला आहे. कंपनीचा दावा आहे की हे भारतातील पहिले शिक्षण पुस्तक आहे, ज्याची किंमत 16,499 रुपये आहे. अॅमेझॉन आणि रिलायन्स डिजिटल या ई-कॉमर्स वेबसाइटवर प्री-ऑर्डरसाठी लॅपटॉप उपलब्ध आहे.
यात 4जी कनेक्टिव्हिटी आणि कार्यप्रणालीसाठी मीडीया टेक 8788 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते हाय-डेफिनिशन व्हिडिओ स्ट्रीमिंग, मल्टी-टास्किंगसह इतर गोष्टी करू शकतील.
जिओ बुक
डिस्प्ले: जिओ बुकमध्ये 11.6-इंचाचा अँटी-ग्लेअर एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या चारही बाजूंना वाइड बेझल्स उपलब्ध आहेत. व्हिडिओ कॉलिंगसाठी 2 एमपी सिंगल कॅमेरा आहे.
सॉफ्टवेअर: डिव्हाइस जिओ ऑपरेटिंग सिस्टम (ओएस) वर चालते. कंपनीने सांगितले की, ही ऑपरेटिंग सिस्टीम लर्निंगनुसार तयार करण्यात आली आहे.
हार्डवेअर: कार्यक्षमतेसाठी, लॅपटॉपमध्ये मीडीयाटेक 8788 ऑक्टा-कोर प्रोसेसर, आहे.
बॅटरी: पॉवर बॅकअपसाठी यामध्ये 4000 बॅटरी एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. लॅपटॉपची बॅटरी 8 तासांपेक्षा जास्त बॅकअप देणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.
कनेक्टिव्हिटी पर्याय: कनेक्टिव्हिटीसाठी लॅपटॉपमध्ये ब्लूटूथ, वाय-फाय, दोन यूएसबी 2.0 पोर्ट देण्यात आले आहेत.









