मोदींनी देशासाठी स्वत:ला झोकून दिलं आहे. 24 तासांपैकी मोदी 18 तास काम करतात. देशात मोदींसारख लोकप्रिय व्यक्तिमत्व नाही. मोदी सामान्यांची स्वप्न पूर्ण करत आहेत, अस कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं. आज पुण्यात ते बोलत होते. महापुरूषांबद्दल बेताल वक्तव्य सहन करणार नाही. बेताल वक्त्यांप्रकरणी भिंडेंवर पोलीस योग्य ती कारवाई करतील असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकारसोबत गेलोय. शिंदे, फडणवीसांसोबत विश्वासानं काम करतोय.सध्या गरजेपुरते आमदार सोबत आहेत, अस सूचक वक्तव्यही अजित पवार यांनी केलं.
आज लोकमान्य टिळक पुरस्कारच्या वितरणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एका स्टेजवर होते.यावेळी अजित पवार स्टेजच्या मागे गेले. यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, शरद पवारांचा आदर करतोय म्हणूनच स्टेजवरून मागे गेलो. परिवार हा परिवारच असतो. वडिलधाऱ्यांचा आदर करतो.आम्ही एकत्रच आहोत, अस स्पष्टीकरण यावेळी दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले की,पुण्यातील ट्राफिकच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.पुणे- नाशिक रेल्वेसंदर्भातही चर्चा होईल. अनेक प्रश्न केंद्राच्या ताब्यात असतात. त्यामुळे राज्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीत जावचं लागतं.पुण्यातील प्रकल्पांना आता गती मिळेल. एसटी महामंडळाला 5 हजार इलेक्ट्रीकल बसेस देण्यात येणार आहेत यामुळे प्रदुषणाची समस्या कमी होण्यास मदत होईळ असेही ते म्हणाले.








