वीज अधिकाऱ्यांना घेराव घालुन विचारला जाब
ओटवणे प्रतिनिधी
ओटवणे गावातील खंडीत विज समस्येसह गावाला विज पुरवठा करणाऱ्या नवीन वीज वाहिनीच्या प्रलंबित कामाबाबत अनेकवेळा लक्ष वेधुनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त ओटवणे ग्रामस्थांनी सावंतवाडी विज वितरणचे कंपनीचे उपअभियंता कुमार चव्हाण, सहाय्यक अभियंता श्री परब आणि कनिष्ठ अभियंता आर. आर. मोरे यांना धारेवर धरीत याचा जाब विचारला.
यावेळी ग्रामस्थांनी खंडित वीज पुरवठ्यामुळे सामोरे जावे लागणाऱ्या अनेक समस्यांचा पाढाच वीज अधिकाऱ्यांसमोर मांडून इन्सुली विज उपकेंद्रातून पुरवठा केल्या जाणाऱ्या वीज वाहिनीतील दोष कायमस्वरूपी मिटवून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. तसेच माजगाव विज उपकेंद्रातून ओटवणे गावाला वीज पुरवठा करणाऱ्या नविन वीज वाहिनीचे काम गेले चार महिने अर्धवटस्थितीत असल्याबद्दल उप अभियंता कुमार चव्हाण यांना जाब विचारून विज वाहिनीचे हे प्रलंबित काम तात्काळ मार्गी लावून फोटोने गावातील विजय समस्येचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा अशी मागणी केली. त्यानंतर याबाबत संबधित ठेकेदार व ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन गणेश चतुर्थीपूर्वी नवीन विज वाहीनीतून विजपुरवठा सूरू करण्याची ग्वाही दिली.
यावेळी ओटवणे उपसरपंच संतोष कासकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष रवींद्र गावकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष तावडे, सगुण गावकर, उमेश म्हापसेकर, जयगणेश गावकर, अमेय गावडे, संतोष भैरवकर, सत्यवान गावकर, रामदास गावकर, किरण गावकर, अनंत तावडे, प्रमोद केळुसकर, विनायक वर्णेकर, स्वप्निल म्हापसेकर, निलेश माठेकर, पंकज गावकर, माजी सैनिक श्री भानसे, ओंकार गावकर, ज्ञानेश्वर गावकर, अमित गावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.