महसूल विभागातर्फे आयोजन
मालवण / प्रतिनिधी
महसूल सप्ताह अंतर्गत मालवण तालुक्यातील कोळंब ग्रामपंचायत येथे दिनांक 03/08/2023 रोजी दुपारी 3.00 वाजता एक हात मदतीचा॔ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निवृत्ती योजना श्रावण बाळ सेवा योजना या शासकीय योजनांबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच ई – पिक पाहणी मोबाईल ॲप बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सलोखा योजनेबाबत माहिती देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उपस्थित राहून सदर माहितीचा लाभ घ्यावा असे आवाहन कोळंब मंडळ अधिकारी सौ. मिनल चव्हाण यांनी केले आहे.









