बेळगावची आयुशी गोडसे उपविजेते
बेळगाव : बेंगलूर येथे कॅनरा युनियन संघटनेतर्फे राज्यस्तरीय अग्रमानांकित टेबल टेनिस स्पर्धेत 13 वर्षाखालील एकेरी मुलींच्या गटात बेळगावच्या तनिष्का काळभैरवने राशीचा 3-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. तर 15 वर्षाखालील गटात आयुशी गोडसेला उपfिवजेतेपदावर समाधान मानावे लागले. बेंगलोर येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात 13 वर्षाखालील गटात बेळगावची अग्रमानांकित खेळाडू तनिष्का काळभैरवने बेंगळूरच्या राशीचा 11-6, 11-4, 11-5 अशा गेम्समध्ये पराभव करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. तर 15 वर्षाखालील गटात मात्र बेळगावच्या आयुशी गोडसेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांना टेटे प्रशिक्षक बैलुरचे मार्गदर्शन लाभत आहे









