जेव्हा लोक स्वत:च्या स्वप्नवत विवाहाविषयी विचार करतात, तेव्हा सर्वसाधारणपणे एक सुंदर अन् रोमँटिक सेटअप त्यात सामील असतो. ज्यात वधू अन् वराने सर्वात आकर्षक कपडे परिधान केलेले असतात. नव्या जमान्यातील जोडपी पारंपरिक सेटअप सोडून आता डेस्टिनेशन वेडिंगवर भर देत आहेत. याचबरोबर लोक स्वत:चा हा दिवस स्मरणीय ठरावा, म्हणून अनोख्या पद्धती शोधून काढत आहेत.
एका जोडप्याने केवळ स्वत:साठी नव्हे तर विवाहात आलेल्या पाहुण्यांसाठी देखील अॅडव्हेंचरस सेलिब्रेशनची निवड केली आहे. हा विवाह इतका अनोखा होता की याचा जल्लोष करताना वधू, वर आणि पाहुण्यांपासून पाद्री देखील हवेत उडत होते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक वधू आणि वर, विवाह सोहळ्यातील पाहुण्यांसह एका एंच टेकडीवरून स्कायडायव्हिंग करताना आणि मजेशीर रोमांचाचा आनंद घेताना दिसून येतात. विशेषकरून प्रिसिला एंट आणि फिलिपो लेक्वेर्सच्या स्वरुपात ओळखल्या जाणाऱ्या जोडप्याने टेकडीवर विवाह केला आणि नव्या जीवनाच्या सुरुवातीचा आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व पाहुण्यांसोबत रोमांचक उडी घेतली आहे. विवाहात उपस्थित सर्व लोक आवश्यक सुरक्षा उपकरणांनी युक्त होते.
यासंबंधीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आमचा हात पकडणाऱ्या लोकांसोबत आम्ही उडी घेत आहोत. डर के आगे जीत है या वाक्याची असल्याची आठवण करून देणारे हे उ•ाण आहे असे याच्या पॅप्शनदाखल म्हटले गेले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोक तो पाहून दंग झाले आहेत. काही लोक या अनोख्या वेडिंग सेलिब्रेशनमुळे रोमांचित झाले आणि जोडप्याची निडरता आणि साहसाचे कौतुक करत आहेत. हा जल्लोष काही अधिकच अॅडव्हेंचरस झाले आणि जीवघेणे ठरू शकले असते, असे काही लोकांचे म्हणणे आहे.









