मोहन धुंडीराज दाते यांचे प्रतिपादन : सांखळी बिल्वदल-परिवारतर्फे आयोजित व्याख्यान, ज्योतिष विषयक शंकासमाधान कार्यक्रम
सांखळी : भारतीय संस्कृती आणि भावनिक संगमातून देव, देश आणि धर्म यापलीकडे जाऊन विज्ञान म्हणून पंचांग शास्त्राकडे पाहणे आवश्यक आहे. हे लोकांच्या भावनांशी सर्वथाने जोडले गेले आहे. तिथी, वार, नक्षत्र, योग, आणिकरण ही पंचांग शास्त्राची पाच प्रमुख अंगे आहेत. पंचांगाची ग्रहस्थिती ही आकाशाचा आरसा असला पाहिजे. हे सुसंगत आचारधर्म पुस्तक आहे. आपण काळानुसार चाललो तर सामाजिक व्यवस्था टिकून राहते, असे प्रतिपादन दाते पंचांग परिवाराचे ज्योतिषाचार्य मोहन धुंडीराज दाते यांनी सांखळी येथे केले. नामवंत ज्योतिष अभ्यासक आणि सोलापूर येथील पंचांगकर्ते धोंडीराजशास्त्री दाते यांचे चिरंजीव मोहन दाते यांचे व्याख्यान आणि ज्योतिष विषयक शंकासमाधान चर्चात्मक कार्यक्रम सांखळी बिल्वदल-परिवारतर्फे रविवारी सकाळी कारापूर येथील वे.घन:श्याम शास्त्री जावडेकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ज्योतिषाचार्य मोहन धुंडीराज दाते बिल्वदल सांखळीचे अध्यक्ष सागर जावडेकर, सचिव कऊणा बाव्रे, म. कृ. पाटील, विनोद गाडगीळ यांची उपस्थिती होती. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. वे. घन:श्यामशास्त्री जावडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पंचांगनिर्मितीत निसर्ग, आकाश, ग्रह, ताऱ्यांचा अभ्यास महत्त्वाचा !
आजच्या आधुनिकरणात पंचांगनिर्मिती म्हणजे परिसर, हवामान अभ्यासक असणे आवश्यक आहे. देव, धर्म, देश आणि सामाजिक विधी, सामाजिक, पूजा पाठ, मृत्यू नंतरची विधी कार्य, ग्रह, राशी, भविष्य, कालचक्र, सूर्य तारे, ग्रहण सामजिक रचना, देवकार्य यांचे गणित सोडवून जोतिष अभ्यास कार्य करत असतो. या विषयावर मोहन दाते यांनी उपस्थितांना सविस्तर समजेल या भाषेत समजावून सांगितले. आपण नाते संबंध जोडल्याशिवय भारतीय संस्कृती टिकून राहणार नाही. त्यासाठी नात्यातील संबंध जोडून ठेवा. नाते संबंध आणि दु:ख सोयरसुतक आजकालचा समाज शास्त्र मानत नासाला तरी सामाजिक कार्यात नाते संबंध आणि सोयरसुतक पाळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपले संबंध अधिक ऊजले जाऊ शकतात आणि शास्त्रानुसार ते पाळणे आवशक आहे. असेही त्यांनी सांगितले.
108 वर्षांची परंपरा जपणारे दाते परिवार पंचांग : सागर जावडेकर
देशात भरात पंचांग सेवेची 108 वर्षची सेवा देऊन परंपरा जपणारे दाते परिवार खरच लोक सेवेचे प्रतिक आहे .आजच्या आधुनिक विज्ञान युगातही पंचांगाला फार महत्त्व आहे. आजही माणूस, वातावरण, हवामान, तिथी इत्यादी विविध विषयाची माहिती यात उपलब्ध होत असते, असे स्वागतपर भाषणात बोलताना सागर जावडेकर यांनी सांगितले. मोहन दाते यांचे त्यांनी स्वागत केले. ज्योतिषचार्य दाते यांची ओळख विनोद गाडगीळ यांनी करून दिली.
बिल्वदल परिवारतर्फे मोहन दाते यांचा सन्मान
विठ्ठलापूर कारापूर सांखळी येथील बिल्वदल परिवारतर्फे नामवंत जोतिष अभ्यास मोहन दाते यांना श्रीफळ शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.









