शिरोडा : बोरी पंचायतीच्या ग्रामसभेत सुधारीत व वाढीव घरपट्टी तसेच व्यावसयिक करवाढीचे जोरदार पडसाद उमटले. मोठ्यासंख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी घरपट्टी व व्यावसायिक कर वाढीला जोरदार विरोध केला. ही सुधारीत घरपट्टी म्हणजे ग्रामस्थांच्या डोक्यावर अतिरिक्त आर्थिक बोजा असून ती रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. पंचायत मंडळाने मात्र त्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. सरपंच दुमिंगो वाझ यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सकाळी पंचायत सभागृहात झालेल्या या ग्रामसभेत अपेक्षेप्रमाणे सुधारीत घरपट्टीच्या मुद्यावऊन वातावरण तापले. बेतकी येथे होऊ घातलेला इस्कॉन प्रकल्प, रस्ता ऊंदीकरण व अन्य विषय सभेत चर्चेला आले. मागील पंचायत मंडळाच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या सभागृहाच्या खर्चाचा तपशील व जुन्या पंचायत घराच्या कामासंबंधी खर्चाचे ऑडिट आधी सादर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. हे ऑडिट सभेसमोर सादर केल्याशिवाय गेल्या वर्षीचे ऑडिट मंजूर करण्यास हरकत घेण्यात आली.
बोरी पंचायतीने यंदाच्या आर्थिक वर्षापासून 7 ऊपयांवऊन चारपट म्हणजेच 28ऊपये प्रति चौरस मिटर वाढविण्यात आले आहे. व्यावसायिक करात 10 ऊपयांवऊन 140 या प्रमाणे वाढ करण्यात आली आहे. शिवाय कचरा वसुली कर म्हणून प्रत्येक घरामागे दरमाही 20 ऊपये व आस्थापनांना 50 ऊपये या प्रमाणे लागू करण्यात आला आहे. पंचायत मंडळाच्या या निर्णयाला आधीपासूनच ग्रामस्थ व काही पंचसदस्यांचा विरोध होता. रविवारच्या ग्रामसभेत या सुधारीत कररचनेवर जोरदार चर्चा झाली. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात घरपट्टी केवळ एक ऊपया निश्चित करण्यात आली होती. सध्याचे सरकारही भाजपाचेच असून घरपट्टीच्या नावाखाली ग्रामस्थांना हा भुर्दंड का ? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. तसेच कोराना काळात ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीतून अद्याप नागरिक सावरलेले नाहीत. भरमसाठ कर वाढवून पंचायत नागरिकांवर अतिरिक्त बोजा टाकत आहे, असा आरोप करण्यात आला. बोरी पंचायत क्षेत्रात फारसे व्यावसाय धंदे नाहीत. जे काही चालतात तेच अडचणीत आहेत. त्यामुळे छोट्यामोठी व्यावसायिकांना व दुकानदारांना हा अतिरिक्त भुर्दंड ठरणार असल्याची बाजू ग्रामस्थांनी मांडली. भाडेकऊ ठेवणाऱ्या घरमालकांकडून एका महिन्याचे भाडे पंचायतीला देणे सक्तीचे करणे हेही योग्य नाही. अनेक सामान्य घरमालकांचा त्यावरच उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे ही सक्ती मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
शिरशिरे भागातील पाणी टंचाई, तळप गडगो येथे रस्ता ऊंदीकरण, पावसाळ्यानंतर रस्त्यांचे काम हाती घेणे, इस्कॉन प्रकल्पावर खास ग्रामसभा बोलावून या प्रकल्पाविषयी माहिती देणे या व अन्य विषयांवर सभेत चर्चा झाली. यावेळी झालेली चर्चेत माजी सरपंच चंद्रू गावडे, थाणू नाईक, उत्कर्ष बोरकर, सुदेश बोरकर, डेविड रॉड्रिगिस, सचिन नाईक, राहूल नाईक, बाळा नाईक, वसंत परवार, शैलेश नाईक व अन्य ग्रामस्थांनी भाग घेतला. उपसरपंच किरण नाईक व अन्य सर्व अकराही पंचसदस्य यावेळी उपस्थित होते. जिल्हा पंचायत सदस्य दीपक बोरकर हेही उपस्थित होते. सचिव गोकुळदास कुडाळकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले.