कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रकार
बेळगाव : धोकादायक झाड आहे म्हणून भर रस्त्यातच कचराकुंड ठेवल्याचा प्रकार नानावाडी रोडवरील रायगड गेटजवळ घडला आहे. यामुळे प्रवाशी वर्गातून आणि नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याकडे कॅन्टोन्मेंट लक्ष देणार का? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. शहरासह कॅन्टोन्मेंट भागामध्येही अनेक धोकादायक झाडे आहेत. मराठा लाईट इन्फंट्रीच्या रायगड गेटजवळच हे धोकादायक झाड आहे. वास्तविक हे झाड हटविणे गरजेचे आहे. मात्र झाड हटविण्याऐवजी चक्क रस्त्याच्या मधोमधच कचराकुंड ठेवण्यात आले आहे. मात्र यामुळे अपघात घडण्याची शक्यता असून तातडीने याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.









