वृत्तसंस्था/ वॉरसो (पोलंड)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या वॉरसो खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेक आणि विकमेयर यांच्यातील लढत काही तासासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे.
या स्पर्धेतील स्वायटेक आणि विकमेयर यांच्यातील उपांत्य फेरीची लढत 6-1, 5-2 अशी असताना अंधुक प्रकाशामुळे ती थांबवावी लागली. हा सामना रविवारी पुढे खेळवला जाणार आहे. बेल्जियमच्या विकमेयरला पहिला सेट एकतर्फी गमवावा लागला तर दुसऱ्या सेटमध्ये ती पराभवाच्या समीप पोहोचली आहे. अन्य एका उपांत्य सामन्यात जर्मनीच्या लॉरा सिगमंडने आपल्या देशाच्या मारियाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे