वृत्तसंस्था/ हॅम्बुर्ग (जर्मनी)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या हॅम्बुर्ग युरोपियन खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा चौथा मानांकित अॅलेक्झांडर व्हेरेव्ह तसेच सर्बियाचा डिजेरी यांनी एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे.
शनिवारी झालेल्या या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात चौथ्या मानांकित व्हेरेव्हने आर्थर फिल्सचा 6-2, 6-4 तर दुसऱ्या उपांत्य लढतीत सर्बियाच्या लेस्लो डिजेरीने झेंग झीहेनचा 6-3, 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आता जेतेपदासाठी व्हेरेव्ह आणि डिजेरी यांच्यात गाठ पडेल. सर्बियाच्या डिजेरीने 2022 च्या ऑगस्टनंतर एटीपी टूरवरील स्पर्धेत पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली.









