► वृत्तसंस्था/ फिरोजपूर
पंजाबमधील फिरोजपूरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेजवळील गझनी वाला गावातील 2 भारतीय तरुण पुरात वाहून गेल्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचले आहेत. चेकपोस्टवर झालेल्या फ्लॅग मीटिंगमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी याबाबत माहिती दिली आहे. ध्वज बैठकीदरम्यान याबाबत माहिती मिळाली असून आता दोन्ही तरुणांच्या परतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले. हे दोन्ही तरुण लुधियानाचे रहिवासी असून ते श्री हरिमंदर साहिबला जात असल्याचे सांगून त्यांच्या घरी निघाले होते. मात्र, सध्या ते दोघेही पाकिस्तानात पोहोचल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









