इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम लवकरच : अध्यक्षांनी दिली आगामी योजनांची माहिती : 400 किलोमीटरच्या कक्षेत पाठविणार
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) रविवारी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (पीएसएलव्ही) वापरून सिंगापूरचे उपग्रह यशस्वीरित्या अभिप्रेत कक्षेत पाठवले. या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी अवकाश संशोधन केंद्राकडून पुढील काही महिन्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावर्षी ‘जीएसएलव्ही’ प्रक्षेपणासह अनेक रोमांचक मोहिमा पार पाडल्या जातील असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेंतर्गत लवकरच तिघांना अवकाशात पाठविले जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर पेले.
चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणानंतर इस्रोने आता गगनयान प्रकल्पावर लक्ष केंद्रीत केले आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत 3 जणांना तीन दिवसांसाठी अंतराळात पाठविले जाणार आहे. या अंतराळवीरांना 400 किलोमीटरच्या कक्षेत लाँच करुन परत आणले जाईल आणि समुद्रात लँडिंग करण्यात येणार असल्याचे इस्रो अध्यक्षांनी सांगितले.
इस्रोने अलीकडेच तामिळनाडूच्या महेंद्रगिरीमध्ये इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये गगनयान सर्व्हिस मॉड्यूल प्रोपल्शन सिस्टीमचे (एसएमपीएस) यशस्वी परीक्षण पेले आहे. गगनयानचे सर्व्हिस मॉड्यूल एक बाय प्रोपेलेंट आधारित प्रोपल्शन सिस्टीम आहे. अंतराळात जाण्यादरम्यान ऑर्बिटल मॉड्यूलच्या गरजा त्याच्याकडून पूर्ण केल्या जातात. यात ऑर्बिट इंजेक्शन, सर्क्युलरायजेशन, ऑन-ऑर्बिट कंट्रोल, एबोर्ट सामील आहे. हॉट टेस्टिंग 250 सेकंदांपर्यंत चालेल. यात परीक्षण प्रोफाईलचे पालन करत आरसीएस थ्रस्टर्ससोबत एलएएम इंजिन्सना कंटीन्यूड मोडवर फायर करण्यात आल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. गगनयान सर्व्हिस मॉड्यूल प्रोपल्शन सिस्टीमला लीक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरने (एलपीएससी) डिझाईन आणि विकसित केले आहे.
ऑगस्टमध्ये पीएसएलव्ही मोहीम
इस्रोद्वारा हाती घेतलेल्या भविष्यातील प्रक्षेपण मोहिमांबद्दल माहिती देताना अध्यक्ष सोमनाथ यांनी ऑगस्ट महिन्यात किंवा सप्टेंबरच्या सुऊवातीला आणखी एक पीएसएलव्ही मोहीम राबवणार असल्याचे स्पष्ट केले. या मोहिमेमध्ये पीएसएलव्ही पुन्हा उ•ाण करणार असून त्याची तयारी सध्या शास्त्रज्ञांकडून सुरू आहे.
चांद्रयान-3 चे यशस्वी मार्गक्रमण
14 जुलै रोजी चांद्रयान-3 चे प्रक्षेपण झाल्यापासून येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये त्याच्यावर अचूक नजर ठेवली जात आहे. शास्त्रज्ञ सध्या अवकाशयानाच्या कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेत गुंतले आहेत. आता पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर नियोजित 1 ऑगस्टला ते चंद्राच्या दिशेने प्रवास करण्याचा टप्पा तयार झाला आहे. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग नियोजित आहे.









