परूळे/ प्रतिनिधी
पहिल्यांदाच जागतिक मंदिर संमेलनाचे आयोजन देशातील काशी क्षेत्र वाराणसी येथे आयोजन करण्यात आले. या मंदिर अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील श्रीदेव वेतोबा देवस्थान परूळे,आरवली वेतोबा देवस्थान, कुडाळ तालुक्यातील माणगाव दत्त मंदिर आदि जिल्ह्यातील तीन मंदिर देवस्थान विश्वस्तांनीही आपला सहभाग नोंदवला.
वाराणसी येथे शनिवारपासून तीन दिवस घेण्यात आलेले जागतिक मंदिर अधिवेशनाचे आयोजन मुंबईतील अंत्योदय प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. या संमेलनात भारतासह इतर ३५ देशातील मिळून १२०० हून अधिक मंदिर समिती सदस्य सहभागी झाले. या मंदिर अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परूळे वेतोबा देवस्थान, आरवली वेतोबा देवस्थान माणगाव श्री क्षेत्र दत्त मंदिर देवस्थान याची निवड करण्यात आली होती या अधिवेशनास माणगांव दत्त मंदिर ट्रस्टी श्री डॉ गुरु गणपते, श्री सादले ,वेतोबा मंदिर परुळे ट्रस्टी श्री सचिन सामंत आणि दीपक सामंत आणि वेतोबा आरवली ट्रस्टी आंबा टक्कर आदि देवस्थानांची उपस्थिती होती या संमेलनात सर्व मंदिरांना एका व्यासपीठावर आणुन त्यांचे विचारांची देवाणघेवाण करण्यात आली.
यामध्ये प्रमुख मंदिर व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, आर्थिक नियोजन, सामाजिक कार्य, स्थान महात्म्य व भविष्याची वाटचाल असे अनेक मुद्यांवर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनास अतुल्य भारत या अंतर्गत भारत सरकारचा पाठींबा लाभला आहे.पंढरपूर, शिर्डी तिरुपती अष्टविनायक नाशिक लंडन युगंदा गोवा असे पूर्ण जगातील मंदिर विश्वस्थ उपस्थित होते.









