वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमधील बोकारो येथे मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान ताजिया विजेच्या तारेला धडकल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मोहरमनिमित्त शनिवारी सकाळी पेटवार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ताजिया काढण्यात आला होता. हा ताजिया विजेच्या तारेखाली आल्याने हायव्होल्टेज विजेचा धक्का लागून मोठी दुर्घटना घडली. अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने ऊग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चौघांना प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.









