उचगाव, वार्ताहर-
Kolhapur News : आमदार सतेज पाटील गटाच्या करवीर तालुक्यातील गडमुडशिंगीच्या अश्विनी अरविंद शिरगावे यांना सदस्य पद अपात्रतेप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.शिरगावे यांचे सदस्य पद रद्द करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे आपणास सरपंच पदासाठीही दिलासा मिळाला असून, सोमवारपासून गडमुडशिंगी सरपंच म्हणून पुनश्च सक्रिय राहणार असल्याची माहिती अश्विनी अरविंद शिरगावे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
गडमुडशिंगीच्या सरपंच अश्विनी अरविंद शिरगावे यांनी दोन सदस्यांसह जून महिन्यात आमदार सतेज पाटील गटात जाहीर प्रवेश केला होता.दरम्यानच्या काळात अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून रामचंद्र शिरगावे यांनी त्यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.यावर सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी १६ जून २०२३ रोजी अश्विनी शिरगावे यांचे सदस्य पद रद्दबातल ठरवले होते. यामुळे शिरगावे यांचे सरपंच पदही अपात्र झाले.
सदस्य पद अपात्रतेच्या विरोधात शिरगावे यांनी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले होते. मात्र स्थगिती मिळाली नाही.त्यानंतर अश्विनी शिरगावे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. शिरगावे यांनी दाखल केलेल्या अपीलावर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन.आर.बोरकर यांच्यासमोर सुनावणी होवून त्यांचं सदस्य पद रद्द करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली.सरपंच ,सदस्य अपात्र प्रकरणात उच्च स्थगिती मिळाल्याने गडमुडशिंगीत आमदार सतेज पाटील गटात उत्साहाचे वातावरण असल्याचे सरपंच अश्विनी शिरगावे यांनी सांगितले.
याप्रकरणी आमदार सतेज पाटील, दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, डॉ. अशोक पाटील, संजय पाटील (चेअरमन) विष्णू पाटील,अरुण शिरगावे सचिन पाटील (माजी पं.स.सदस्य) आनंदा बनकर, बाबासो माळी,ग्रा.प. सदस्य रावसाहेब पाटील, सुदर्शन पाटील, संजय सकटे , दिलीप थोरात ,छाया नेर्ले ,अलका सोनुले, तेजस्विनी सुर्यवंशी व सतेज पाटील गटाचे सर्व कायकर्ते यांचे सहकार्य मिळाले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.









