रस्त्याच्या प्रवेशद्वारासमोरच सीडीवर्कला भगदाड
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकाजवळील रहदारी सिग्नलजवळच सीडीवर मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे त्याठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मात्र यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. स्मार्ट सिटीमधील कामांचा दर्जा समोर आला आहे. मध्यवर्ती बसस्थानकाकडून खडेबाजारकडे येणाऱ्या या रस्त्याच्या प्रवेशद्वारासमोरच असलेल्या सीडीवर्कला भगदाड पडले आहे. याठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. यातच हा मोठा ख•ा पडल्यामुळे त्याठिकाणी रहदारी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. मात्र यामुळे अडथळा निर्माण होत असून तातडीने त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.









