ई स्कूटर नवीन फ्रंट सस्पेशनसह सहा कलरमध्ये होणार उपलब्ध
वृत्तसंस्था/ बेंगळूर
बेंगळूरू येथे असणाऱ्या स्टार्टअप कंपनी ओला इलेक्ट्रिकने नवीन निऑन कलर पर्यायामध्ये एस1 एअर या दुचाकीचे सादरीकरण केले आहे. कंपनीचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर टीझर जारी करून याबाबत माहिती दिली आहे.
प्रगत मूव्ह ओएस 3 तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स आता 6 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध होणार आहे. निऑन व्यतिरिक्त, यात स्टेलर ब्लू, पोर्सिलेन व्हाइट, कोरल ग्लॅम, लिक्विड सिल्व्हर आणि मिडनाईट ब्लू यांचा समावेश असणार आहे. भारतीय बाजारपेठेत, ओलाची ही इलेक्ट्रिक स्कूटर एथर 450ए शी स्पर्धा करेल, जी 3 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे.
प्री बुकिंग सुरू
खरेदी विंडो 28 ते 31 जुलै दरम्यान उघडणार आहे.कंपनीने 22 जुलैपासून ओला एस1 एअरच्या प्री-बुकिंगला सुरूवात केली आहे. खरेदीदार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून 999 रुपयांमध्ये बुक करता येणार असल्याची माहिती आहे.
ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी ट्विट केले की, ‘एस1 एअरसाठी खरेदीची विंडो 28 जुलै ते 30 जुलै दरम्यान उघडेल. 1,09,999 रुपये (एक्स-शोरूम) ची प्रारंभिक किंमत असणार आहे. यानंतर, 31 जुलैपासून, तुम्हाला ई-स्कूटरसाठी 1,19,999 रुपये (एक्स-शोरूम) द्यावे लागतील, याची डिलिव्हरी ऑगस्टमध्ये सुरू होईल. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट 3 राइडिंग मोड आहेत.
15 ऑगस्टला आणणार इलेक्ट्रिक बाइक
9 फेब्रुवारी रोजी, ओला इलेक्ट्रिकने ए1 एअर सोबत ओला ए1 आणि ए1 प्र्रोचे सादरीकरण केले. ओला इलेक्ट्रिक स्कूटर्स आता भारतीय बाजारात 6 पर्यायांसह उपलब्ध आहेत. यासोबतच पहिल्यांदाच 5 इलेक्ट्रिक बाइक्सची झलकही दाखवण्यात आली. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की कंपनी 15 ऑगस्ट रोजी या इलेक्ट्रिक बाइक्सचे अनावरण करू शकते.









