ग्रामस्थांनी नोंदवलेल्या हरकतीनंतर झाला बदल
आचरा प्रतिनिधी
आचरा ग्रामपंचायतची मुदत २० एप्रिल रोजी संपली असून त्यांनतर ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला होता. आचरा ग्रामपंचायतच्या जून महिन्यात झालेल्या विशेष ग्रामसभेत आगामी काळात होणाऱ्या आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत प्रभाग रचनेनुसार जाहीर करण्यात आली होती. मात्र या आरक्षण सोडतीला काही ग्रामस्थांनी हरकत घेतली होती. या हरकतीनंतर आरक्षणच्या सोडतीत बदल करण्यात आला आहे.
हरकतीनंतर असे झालेत आरक्षण रचनेत बदल
आचरा ग्रामस्थांच्या हरकती नंतर प्रभाग एक- (हिर्लेवाडी, पिरावाडी) मधील तीन जागामधील नामप्र हे आरक्षण बदलून सर्वसाधारण झाले आहे, प्रभाग दोन- (जामडूल गाऊडवाडी, काझीवाडा शेखवाडा, डोंगरेवाडी) तीन जागांपैकी सर्वसाधारण स्त्री हे आरक्षण बदलून सर्वसाधारण असे झाले आहे. प्रभाग तीन- (पारवाडी) मधील दोन जागांपैकी सर्वसाधारण स्त्री हे आरक्षण बदलून सर्वसाधारण असे झाले आहे. प्रभाग चार- (मेस्त्रीवाडी,देऊळवाडी, बाजार, बौद्धवाडी) दोन जागांसाठी जाहीर झालेले आरक्षण कायम राहिले असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. प्रभाग पाच- (वरचीवाडी, भंडारवाडी, नागोचीवाडी) तीन जागांसाठी असलेल्या आरक्षणपैकी सर्वसाधारण हे आरक्षण बदलून नामप्र असे करण्यात आले आहे.
हरकतीनंतर अशी राहणार प्रभागनुसार आरक्षण रचना
मालवण तालु्यातील मोठया ग्रामपंचायतपैकी आचरा ग्रामपंचायतमध्ये सरपंच व १३ सदस्य संख्या आहे. होणाऱ्या निवडणुकीसाठी आचरा गावातील प्रभागाची संख्या ५ असून या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षणाची सोडतीवर हरकत घेतल्याने बदल झालेली प्रभागनुसार बदल झालेली आरक्षण सोडत फुढीलप्रमाणे राहणार आहे. त्यामध्ये प्रभाग एक- (हिर्लेवाडी, पिरावाडी) तीन जागांसाठी नामप्र स्त्री, सर्वसाधारण, सर्वसाधारण स्त्री,
प्रभाग दोन- (जामडूल गाऊडवाडी, काझीवाडा शेखवाडा, डोंगरेवाडी) तीन जागांसाठी सर्वसाधारण महिला २, सर्वसाधारण,
प्रभाग तीन- (पारवाडी) दोन जागांसाठी नामप्र स्त्री, सर्वसाधारण,
प्रभाग चार- (मेस्त्रीवाडी,देऊळवाडी, बाजार, बौद्धवाडी) दोन जागांसाठी सर्वसाधारण, सर्वसाधारण स्त्री,
प्रभाग पाच- (वरचीवाडी, भंडारवाडी
नागोचीवाडी) तीन जागांसाठी सर्वसाधारण, सर्वसाधारण स्त्री, व नामप्र एक अशी सोडत जाहीर करण्यात आली आहे.









