वारणानगर / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे भूसंलखन, घरांची पडझड यामुळे ६३ कुटूंबे बाधीत झाली असून यामाध्यमातून ३०९ तात्पूरत्या निराधार नागरिकांना याचा फटका बसला असून पडझडीत ६ लाख ६५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
दगड विट मातीची कच्या व पक्या स्वरूपातील घर,शेड, गोठे यांची भिंत कोसळने आशा पडझडीच्या ३८ घटना घडल्या असून यातील २८ पडझडीची ठिकाणे नुकसानीस पात्र ठरले आहेत तालुक्यात आज करंजफेन येथील बंडू पाटील, कोतोली येथील दादू सोनू पाटील, प्रकाश बाळू पाटील यांच्या घरांची पडझड होऊन ४५ हजार रू. चे नुकसान झाले असून तालुक्यात गुरुवार सकाळ पर्यन्त ३७ मि.मी. पाऊसाची नोंद झाल्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे शशिकांत सातपुते यानी सांगीतले.
पूरस्थिती निर्माण होणाऱ्या गावात आपत्ती व्यवस्थापन सक्षमपणे राबवण्यासाठी तहसिलदार माधवी शिंदे जाधव, नायब तहसिलदार, मंडल अधिकारी,तलाठी, कोतवाल, पन्हाळा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच,उपसरंपच,सर्व सदस्य, सर्व कर्मचारी, पन्हाळा, कोडोली, कळे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील कार्यरत आहेत.









