गोकुळ शिरगाव वार्ताहर
कणेरी (ता. करवीर) येथील दत्त कॉलनी मध्ये राहत असलेल्या मोहन लक्ष्मण देसुरकर यांच्या बंद असलेल्या घराचे मंगळवारी रात्री आज्ञात चोरट्यानी कुलूप तोडून यामधील अडीच तोळ्याचे सोन्याचे घंटन व तीन ग्रॅम च्या कानातील रिंगा असा एकूण 81 हजार रुपयांचा सोन्याचा माल चोरल्याची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
या वेळेला या चोरट्यांनी देसुरकर यांच्या घराबरोबरच आणखीन दोन ठिकाणी चोरी केल्याचे यावेळी दत्त कॉलनी येथील नागरिकांनी सांगितले. पण त्यांना त्या ठिकाणी काही मिळाले नसल्याने त्या ठिकाणची नोंद झालेली नाही. या घटनेचा अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि दिगंबर गायकवाड करीत आहेत .
या वेळी दत्त कॉलनी येथील वर्ल्डकुल रेफ्रिजरेशन मधील कंपनीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरांचा येण्या जाण्याचा वावर दिसत असून चोरांचा शोध घेणे पोलिसांना आता अवघडण नसल्याचे या ठिकाणी ग्रामस्थ बोलत आहेत.









