दुकानवाड /वार्ताहर
सतत सात ते आठ दिवस कोसळणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान केले, वाहतूक विस्कळीत केली, दुकानवाड भागातील सर्वच पुल पाण्याखाली आहेत त्यामुळे पाच गावांचा गेले दहा दिवस संपर्क तुटला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग ने जे. सी. बी. च्या सहाय्याने पुलाच्या पाईपना लागलेली झाडे काढण्याचा प्रयत्न केला परंतु पावसाने पुन्हा जोर धरल्याने झाडे काढता आली नाहीत त्यामुळे जे. सी. बी मागे न्यावा लागला.
सतत पडणाऱ्या पावसाचे जमिनीला ऊमळ पडल्याने झाडे उन्मळून पडत आहे काहींच्या घरावर मांगरावर झाडे पडण्याचे सुरुच आहे. आंजिवडे, उपवडे येथील घरांवर झाडे पडुन नुकसान झाले, बुधवारी सकाळी वसोली येथील प्रभावती भिकाजी सरमळकर यांच्या घरावर जुनाट कलमाचे झाड पडुन नुकसान झाले. त्यात शेत मांगर ,पाण्याची मोटर, पाईप तुटून गेले. जुनाट झाड असल्याने जेसीबी च्या सहाय्याने बाजूला केल्याशिवाय पर्याय नाही. पंचनामा तलाठी राणे यांनी केला यावेळी वसोली सरपंच अजित परब, प्रकाश सरमळकर, मोहन रेमळकर, रावजी कोळगे उपस्थित होते.









