कर्नाटकामध्ये काँग्रेस पक्षाने निवडणुकीपूर्वी पाच गॅरंटी योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यातीलच एक महत्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज दाखल प्रक्रिया सुरु झाली असून दर दिवशी सेवा केंद्रांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. अर्ज करण्यासाठी रेशनकार्ड अपडेट करणे बंधनकारक असल्याने, बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी उसळत आहे. यात वारंवार सर्व्हरडाउनची समस्या उद्भवत असल्याने नागरिकांना तासंतास रांकेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी नागरिक ज्यावेळी जनसेवा केंद्रात जातात त्यावेळी रेशनकार्ड अपडेट व केवायसी उपडेट नसल्यास त्यांना पुन्हा जनसेवा केंद्रातून अन्न व नागरी पुरवठा विभागात जाण्यास सांगितले जाते लागते. त्यानंतर त्यांना रेशन दुकान जाऊन केवायसी करण्यास हेलपाटे खावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









