वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरियातील चेंगवॉन येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या कनिष्ठांच्या विश्व चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत सोमवारी भारतीय नेमबाजांनी आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. पुरुषांच्या 50 मी. पिस्तूल नेमबाजीत वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात भारताने ही सुवर्णपदके मिळवली. 19 वर्षीय कमलजीतने या स्पर्धेच्या शेवटच्या दर्जेदार कामगिरी केली. स्पर्धेच्या पदकतक्त्dयात भारत दुसऱ्या स्थानी राहिला. चीनने पहिले स्थान पटकावले.
भारताने या स्पर्धेत 6 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कास्य अशी एकूण 17 पदके मिळवत दुसरे स्थान घेतले. चीनने 12 सुवर्णपदकांसह एकूण 28 पदकांची कमाई करत पहिले स्थान मिळवले. पुरुषांच्या 50 मी. पिस्तूल नेमबाजीत कमलजीतने वैयक्तिक प्रकारात 600 पैकी 544 शॉट्स नोंदवत सुवर्णपदक पटकावले. या क्रीडा प्रकारात उझ्बेकच्या निकीटीनने 542 शॉट्स नोंदवत रौप्य तर कोरियाच्या तेमीनने 541 शॉट्स नोंदवत कास्यपदक पटकावले. 50 मी. पिस्तूल सांघिक नेमबाजीत भारताने 1617 शॉट्स नोंदवत सुवर्णपदक, उझ्बेकने 1613 शॉट्स नोंदवत रौप्यपदक तर कोरियाने 1600 शॉट्स नोंदवत कास्यपदक मिळवले. महिलांच्या 50 मी. पिस्तूल नेमबाजीत खन्ना अलिव्हाने 520 शॉट्स नोंदवत सुवर्णपदक तरर तियानाने 519 शॉट्स नोंदवत रौप्यपदक घेतले. आता 14 ऑगस्टपासून अझरबेजान येथे सुरू होणाऱ्या आयएसएसएफच्या वरिष्ठांच्या विश्व नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे नेमबाज सहभागी होणार आहेत.









