नेरूर /. वार्ताहर.
मुसळधार पावसामुळे नेरूर कांडरीवाडी येथील विठोबाची खांद येथे सोमवारी सायंकाळी रस्त्यावर दरड कोसळली. त्यामुळे कांडरीवाडी येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या कोसळलेल्या दरडी मुळे रस्त्या नजिकच्या काही घरांना धोका निर्माण झाला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजप नेते तथा माजी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रणजित देसाई यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच ग्रामस्थांना सहकार्य करण्याची कार्यतत्परता दाखविली. नेरूर चव्हाटा येथून वालावल येथे रस्ता जातो त्या रस्त्यावरील चौपाटी परिसरातून डाव्या हाताला डोंगराच्या पायथ्याशी नेरूर कांडरवाडी वसली आहे तेथील ग्रामस्थांची घरे ही डोंगराच्या पायथ्याशी कित्येक वर्षांपासून बांधलेली आहेत. मुसळधार पाऊस कोसळला की येथील डोंगरांची सर्रास पडझड सुरू असते या पडझडी मुळे तेथील ग्रामस्थांना दरवर्षी नुकसान सोसावे लागत आहे. गेल्या पंढरवड्यात मुसळधार पडत आहे. त्यामुळे ही भलीमोठी दरड कोसळली असून त्यामुळे काही घरांना धोका निर्माण झाला आहे. या परिसरात काही ठिकाणी ग्रामस्थांकडून संरक्षक भिंतीची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. रणजित देसाई यांनी तेथे भेट देत भविष्यात संरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्ध व्हावा.यासाठी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी निश्चितच पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.त्यांच्या सोबत पंचायत समितीचे माजी सदस्य संदेश नाईक व नेरूर ग्रामपंचायत सदस्य पपू नारिंग्रेकर व कांडरी वाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, नेरूर कोलडोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या सायचे्टेंब सुतारवाडी येथेही ( पोलीस पाटील गणपत मेस्त्री यांच्या घराशेजारी )भलामोठा वटवृक्ष कोसळला.यात ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. गावातील या दोन्ही घटना जाणून घेत तेथील ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन नेरूर सरपंच भक्ती घाडी यांनी दिले.
Previous Articleखानापूरमध्ये पॉवर ट्रेलर अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg