वाकरे,प्रतिनिधी
Kolhapur Rain Update : कोल्हापूर-गगनबावडा महामार्ग सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने बालिंगे येथे बंद केल्याने तातडीची गरज आहे त्यांनी सांगरूळ फाटा, जनावरांचा बाजार, पडळ फाटा, यवलुज, निटवडे, वरणगे- पाडळी, चिखली, आंबेवाडी ते कोल्हापूर या मार्गे प्रवास करावा. परत येताना याच मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सध्या प्रयाग चिखली येथे रस्त्याखाली 2 फूट पाण्याची पातळी आहे.
सध्या या मार्गावर या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट दिली असता कुठेही महापुराची भीती नाही अथवा रस्त्यावर पाणी आलेले नाहीत.रस्ता अरुंद असल्याने वाहने जपून चालवणे गरजेचे आहे. प्रयाग चिखली येथील पूल अरुंद असल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देणे गरजेचे आहे.
खुपिरे, शिंदेवाडी, वरणगे पाडळी या मार्गावर महापुराचे पाणी असल्याने कोणीही या मार्गाने प्रवास करू नये. प्रशासनाचा पुढील आदेश येईपर्यंत वाहतुकीसाठी रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. यावेळी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी, तहसीलदार स्वप्निल रावडे उपस्थित होते.