दहा कुटुंबांचा संपर्क तुटला, आज आमदार करणार पहाणी
पेडणे : मुसळधार पावसामुळे गेल्या सोमवारपासून कडशी मोपा नदीला उधाण आल्यानंतर आज थोड्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह कमी झाला. मात्र धोका कायम असल्याचे चित्र त्या भागात भेट दिली पहावयास मिळाले. एकूण दहा कुटुंबांचा संपर्क तुटलेला आहे. दरम्यान, पेडणे तालुक्यातील काही पत्रकारानी पाण्याच्या प्रवाहातून वाट काढत घटनास्थळी जाऊन एका कुटुंबाकडे संपर्क साधून त्यांच्या कैफियती ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. कडशी नदी वजा ओहळाला मोठ्या प्रमाणात प्रवाह वाढला होता. या ठिकाणी असलेला पदपूल पूर्ण पाण्याखाली गेला. पलीकडे एकूण दहा कुटुंब राहत असून त्या कुटुंबांचा संपर्क तुटलेला आहे. मागच्या आठवड्यात यासंबंधी वृत्त प्रसारित झाल्यानंतर सरकारी यंत्रणेने मदत कार्य सुरू केले. त्या कुटुंबांच्या सतत संपर्कात सरकारी यंत्रणा राहिली असल्याची माहिती दिली.
मागच्या आठ दिवसापासून या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. कित्येक दिवस या भागात अलीकडून पलीकडे जाता येत नव्हते. संपर्क तुटला. विजेचा लपंडाव, दूरध्वनी सेवा बंद होती. अशा स्थितीत काही पत्रकारांनी पहाटे येऊन आमची चौकशी केली. सरकारी यंत्रणेनेही येऊन पाहणी केली, चौकशी केली त्याबद्दल आपण सरकारी यंत्रणेचे आभार मानत असल्याचे पत्रकार उमेश गाड यांनी यांनी सांगितले. आपली मुले पेडणे येथे शाळा, कॉलेजमध्ये जातात त्यांना मात्र मागच्या आठ दिवसापासून शाळेत जाता आलेले नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे गाड म्हणाले. आठ दिवसांपासून कॉलेजमध्ये जाता आले नाही. त्यामुळे शिक्षक वर्गात शिकवत असलेला अभ्यास आम्हाला चुकत आहे. काही विद्यार्थी, मित्र व्हॉट्सअप, इंटरनेट द्वारे आम्हाला अभ्यास पाठवतात. परंतु प्रत्यक्ष वर्गाला उपस्थित राहता येत नसल्याने विद्यार्थीनी मेघना गाड हिने खंत व्यक्त केली.
धोका पत्करून पूल पार केला
मागच्या दहा दिवसापासून कडशी मोपा नदीला उधाणा आले आहे. त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पेडणे तालुक्यातील पत्रकार निवृत्ती शिरोडकर, महादेव गवंडी, मकबूल मालगीमनी आणि नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर घटनास्थळी गेले होते. त्यात पत्रकार मजबूल माळगिमनी पाय घसरून पाण्यात पडले. त्याच वेळी निवृत्ती शिरोडकर सोबत असल्याने प्रसंगी ओळखून त्याला पकडले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
आमदार आज करणार पाहणी
पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर आज मंगळवारी कडशी मोप येथील नदीची पहाणी करणार आहेत. गेले आनेक दिवस पाण्यामुळे लोकांना त्रास झाला त्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असून योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.









