रत्नागिरी प्रतिनिधी
पश्चिम रेल्वेमार्गावर यंदा मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी अशी विशेष गाडी धावणार असून गणपती निमित्त या गाडीच्या ३० फेऱ्यांची घोषणा पश्चिम रेल्वे कडून करण्यात आली आहे. या मार्गावर नियमित स्वरूपात गाडी सुरू करावी , अशी या मार्गावरील प्रवासी वर्गाकडून तसेच मुंबईतील प्रवासी संघटनांकडून केली जात होती. याची दखल घेत कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी हा मुद्दा दि. ५ जुलै रोजी झालेल्या मडगाव येथील बैठकीत उपस्थित करत या गाडीची मागणी केली होती. आता या गाडीची घोषणा झाली असून पश्चिम रेल्वेवरील प्रवासी वर्गाला याने दिलासा मिळाला असून त्याबद्दल सचिन वहाळकर यांनी पश्चिम रेल्वे व कोकण रेल्वेचे आभार मानले.









