किमत 1 लाख 42 हजार रुपये : तीन रंगात गाडी सादर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिग्गज दुचाकी निर्मिती कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपली नवी हिरो एक्स्ट्रीम 200 एस 4 व्ही ही मोटरसायकल नुकतीच भारतीय बाजारात दाखल केली आहे. सदरच्या दुचाकीची किंमत 1 लाख 41 हजार 250 रुपये इतकी असणार आहे.
युवकांना डोळ्यासमोर ठेवत सदरची गाडी डिझाइन करण्यात आली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. स्पोर्टी ग्राफिक्ससह येणारी ही दुचाकी मून यलो, पँथर ब्लॅक मेटालिक व प्रिमीयम स्टील्थ या तीन रंगात आणण्यात आली आहे. 200 सीसीचे इंजिन यात असून ते चार व्हॉल्व सिंगल सिलेंडरसह ऑइल कुल्ड सुविधेसह आहे. कमी प्रदूषण करणारी ही गाडी असल्याचा दावा कंपनी करते असून या गाडीत मोनोशॉक सस्पेन्शनची सुविधा असण्यासोबत वाइड रेडियल रियर टायर, प्रंट आणि रियर पेटल डिस्क ब्रेकची प्रणालीही असेल.
याही सुविधा
एलईडी हेडलाइटस्, स्पिल हँडलबार, ब्लूटूथ आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हीटीची सुविधा तसेच फुल्ल डिजिटल एलसीडी मीटर, इको मोड इंडिकेटर, सर्व्हिस रिमाइंडर, ट्रिप मीटर अशाही सुविधा मिळणार आहेत.