प्रतिनिधी/बेळगाव : पांगुळ गल्ली येथील बोळात दोन दिवसांपासून भर पावसात एक निराधार वृद्धा निपचिप पडून होती, तिची हि अवस्था पाहून येथील व्यवसाईक अनिल गोकाक यांनी सामाजिक कार्यकर्ते अलेन मोरे यांना फोनवर तिच्या याअवस्थे बद्दल माहिती दिली. ऍलन मोरे व इतर सामाजिक कार्यकर्ते घटना स्थळी दाखल होऊन तिची विचारपूस केली असता ती अशक्त असल्याचे जाणवले, त्या वृद्धेला नीटसे आठवत हि नसल्याने आपले नांव गांव काही सांगता आले नाही. त्यामुळे तिला येथील जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले.
ऍलन मोरे यांच्या सोबत स्वस्तिक फाउंडेशनचे कार्यकर्ते सागर बोरगल, नारु निलजकर, अवधूत तुडवेकर, सॅम्युअल रॉड्रिग्ज व अमिष देसाई यांनी मदत केली.
या कामी त्यांना कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर टी., पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हवन्नावर आणि मार्केट पोलिसांचे सहकार्य लाभले.