खड्ड्यांतून पाणी साचल्याने वाहनधारकांना धोका : आमदारांच्या सूचनेकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
खानापूर : खानापूर शहराच्या सर्वच प्रवेशद्वारातील रस्ते उद्ध्वस्त झाल्याने खानापूर शहरात प्रवेश करणे अत्यंत कठीण झाले आहे. राजा टाईल्स ते रुमेवाडी क्रॉस तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या ब्रिजकम बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला मोठे ख•s पडल्याने गुडघाभर पाणी साचले आहे. या रस्त्यावरून वाहतूक धोकादायक बनलेली आहे. त्यामुळे खानापूर शहरात प्रवेश करणे धोकादायक बनले आहे. याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. बेळगाव-गोवा रस्ता हा राजा टाईल्स ते रुमेवाडी क्रॉस या रस्त्यावरून वाहतूक करणे म्हणजे जीवाशी खेळ करणे असेच झालेले आहे. हा रस्ता कुणाच्या मालकीचा यावरूनही या रस्त्याची गेल्या तीन वर्षापासून दुऊस्ती झालेली नाही. तर रुमेवाडी क्रॉस ते राजा टाईल्स ते गोवा क्रॉस हा रस्ता गेल्या पाच वर्षापासून खड्यांसाठी प्रसिद्ध झाला आहे. याबाबत अनेक वेळेला सर्वच माध्यमातून आवाज उठवूनही या रस्त्याची दुऊस्ती झालेली नाही. रस्त्याच्या दुऊस्तीबाबत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सार्वजनिक बांधकाम खाते आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांबरोबर तीन महिन्यापूर्वी बैठक घेऊन हा रस्ता तातडीने दुऊस्त करण्यासंदर्भात चर्चा केली होती. मात्र लोकप्रतिनिधीच्या मागणीला अधिकाऱ्यांनीच वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. राजा टाईल्स ते गोवा क्रॉस या रस्त्यावर वेळोवेळी अपघातही झालेले आहेत. यात दोघांचा मृत्यूही झालेला आहे. मात्र शासन काही जागे झालेले नाही. ऊमेवाडी क्रॉस ते गोवा क्रॉस हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीस धोकादायक बनला असून रस्त्यावर डबक्मयाचे स्वरूप बनलेले आहे. या रस्त्यावरून नंदगड, हलशी, नागरगाळी, हल्याळ, बिडी, लोंढा या परिसरातील गावांसाठी या रस्त्यावरून वाहतूक होते. नागरिकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या सूचनेकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आमदारांचे घर याच रस्त्यावर
राजा टाईल्स ते गोवा क्रॉस या रस्त्याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन रस्ता दुरस्त करण्याची मागणी केली होती. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हा रस्ता पावसाळ्यापूर्वी निश्चित दुरुस्त होणार असल्याचे वृत्तपत्रांना सांगितले होते. मात्र पाच वर्षापासून या रस्त्याचे भाग्य काही उजळले नाही. आमदार विठ्ठल हलगेकर यांचेही निवासस्थान याच रस्त्यावर आहे. त्यांनाही याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. अधिकाऱ्यांनीही आमदारांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने तालुक्यातील रस्त्यांना कोणी वालीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
खानापूरच्या रस्त्यांना वाली कोण?
अशीच अवस्था आता खानापूर तालुक्मयातील रस्त्यांची झालेली आहे. शासनाला आणखी किती बळींची आवश्यकता आहे? त्यानंतरच हे शासन जागे होणार का, असाही प्रश्नही नागरिकांतून व्यक्त होत आहे.









