मनीषा सुभेदार, बेळगाव
आई-वडील, मुलगा-मुलगी हसते-खेळते चौकोनी कुटुंब. शाळा संपवून मुले कॉलेजची पायरी चढतात आणि त्यांना लगेचच गरज भासते किंवा हवीच असते ती दुचाकी. 18 वर्षांनंतर वाहन चालविण्याचा परवाना मिळतो. मुलांच्या हट्टापायी पालक दुचाकी घेऊन देतात. तरुण वय, सळसळणारे रक्त, सोबत मित्र आणि वेगाशी स्पर्धा करण्याचे वेड. यामुळे भरधाव वेगाने दुचाकी चालविली जाते. कधी पार्टीच्या नादात अल्प किंवा जादा प्रमाणात नशापान होते. त्याच तंद्रीत वाहन हाकले जाते. कधी एखादा अशास्त्राrय स्पीडब्रेकर या वेगाला रोखू पाहतो आणि दुचाकी उडून वाहनस्वाराचा बळी जातो. अलीकडच्या काळात अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या बेळगावमध्ये हेच चित्र वारंवार पहावयास मिळत आहे. कधी भरधाव वेगाने, कधी अशास्त्राrय स्पीडब्रेकरमुळे, कधी रस्त्यावरील ख•dयांमुळे, कधी वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे लाख मोलाचा जीव गमावला जातो. अशात एखाद्या तरुण, कर्त्या मुलाचा, शिक्षण संपवत आलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू कायमचाच चटका लावून जातो. अपघात होण्याच्या अनेक कारणांपैकी अशास्त्राrय पद्धतीने निर्माण केले जाणारे स्पीडब्रेकर हे एक मुख्य कारण आहे. दुर्दैवाने स्पीडब्रेकर कसे बांधावेत? कोठे बांधावेत? त्यांच्या उंची आणि रुंदीचे निकष काय? त्याची गरज किती? याबद्दल समाजामध्ये फार कमी माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम खाते आणि महानगरपालिका यांच्या समन्वयाने स्पीडब्रेकर उभारले जातात. इंडियन रोड काँग्रेसने (आयआरसी) स्पीडब्रेकर्स कसे बांधावेत? याची मार्गदर्शक प्रणाली तयार केली आहे. 1934 पासून ही संस्था अस्तित्वात आहे. मात्र, या प्रणालीनुसार स्पीडब्रेकर बांधले जातात का? हा कळीचा प्रश्न आहे.
स्पीडब्रेकरचे प्रकार
आयआरसीच्या प्रणालीनुसार तीन प्रकारे स्पीडब्रेकर्स असतात. ते म्हणजे स्पीड बंप, स्पीड हंप व स्पीड टेबल! आयआरसीने रस्त्यांची तीन प्रकारात विभागणी केली आहे. अतिवर्दळीचे रस्ते, जोडरस्ते आणि रस्त्याची रचना. यानुसार ‘मोबिलिटी कॉरिडॉर’, ‘फिडर रोड’ व ‘नेबरहूड स्ट्रीट’ यांचा अंदाज घेऊन स्पीडब्रेकर उभे केले जातात. मोबिलिटी कॉरिडॉर रस्त्यावर स्पीड टेबल म्हणजेच उंचवटा असलेले आणि अडीच ते तीन फूट रुंदी असलेले स्पीडब्रेकर बसविणे आवश्यक आहे. नेबरहूड रस्त्यावर वाहनांचा वेग कमी करणारे स्पीड बंप बसविले जातात. यांची रुंदी कमी असून उंची तुलनेने अधिक असते. फिडर रस्त्यावर स्पीड बंप व टेबल हंप यांच्यातील मध्य साधला जातो.
स्पीडब्रेकरची बांधणी
साधारण स्पीडब्रेकरची उंची अडीच ते दहा सेंटीमीटर असावी. लांबी 3.5 सेंटीमीटर असावी. वर्तुळाकार क्षेत्र 17 मीटर असावे. स्पीडब्रेकर्स कुठे बांधावेत? त्याचेही निकष ठरलेले आहेत. शाळा आणि हॉस्पिटलच्या परिसरानजीक स्पीडब्रेकर्स असणे आवश्यक आहे. स्पीडब्रेकर्समुळे चालक आपल्या वाहनाचा वेग कमी करू शकेल, जेणेकरून विद्यार्थ्यांना व रुग्णांना सहजगत्या रस्ता ओलांडणे शक्य होईल. जेथे उ•ाणपूल आहे आणि त्या पुलाचा रस्ता जर अरुंद असेल तर त्या उ•ाणपुलाच्या प्रवेशानजीक स्पीडब्रेकर आवश्यक आहे. वर्दळीच्या रस्त्यावरती स्पीडब्रेकरची गरज असतेच. परंतु, महामार्गावर स्पीडब्रेकर्स बसवू नयेत, अशी आयआरसीची प्रणाली सांगते.
अवजड वाहने
स्पीडब्रेकर्स उभे करताना रस्त्यावरील वर्दळ आणि वाहनांची ये-जा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. अवजड वाहनांसाठी असलेले स्पीडब्रेकर दुचाकीधारकांसाठी धोक्याचे ठरू शकतात. तर दुचाकीसाठीचे स्पीडब्रेकर्स अवजड वाहनांसाठी अडचणीचे ठरतात. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ लक्षात घेऊन या दोन्हींचा मध्य साधेल, असा स्पीडब्रेकर उभा करणे अपेक्षित आहे. स्पीडब्रेकरवरून वाहन जाताना त्याचा जोरात आवाज येऊ नये हे अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पीडब्रेकरमुळे वाहनचालकाला कोणतेही धक्के न बसता आरामशीरपणे वाहन चालविता येणे आवश्यक आहे. स्पीडब्रेकरसाठीचे हे निकष असले तरी प्रत्यक्षात बेळगाव शहरातील बरेच स्पीडब्रेकर्स अशास्त्राrय पद्धतीने उभारण्यात आले आहेत. एक तर वर्दळीच्या रस्त्यावर आयआरसीच्या नियमानुसार स्पीडब्रेकर्स नाहीत. दुसरीकडे जे स्पीडब्रेकर्स उभारले आहेत ते अत्यंत अरुंद किंवा अत्यंत रुंद असे आहेत. दोन रस्ते जेथे जोडले जातात, तेथे स्पीडब्रेकर्स नसले तरी त्या दोन रस्त्यांमध्ये सीडी वर्कचे बांधकाम प्रमाणापेक्षा अधिक उंचीचे आहे. त्यामुळे तेथे वाहन चालविणे हे चालकाला अतित्रासदायक ठरत आहे.
स्पीडब्रेकर्स विषयीचे सूचनाफलक
स्पीडब्रेकर आहे, हे वाहनचालकाला किमान 40 मीटर आधी कळणे आवश्यक आहे. त्यामुळे ते अंतर घेऊन तसा फलक लावणे बंधनकारक आहे. याशिवाय स्पीडब्रेकर असल्याचे चिन्ह सुद्धा दर्शविणे गरजेचे आहे.
स्पीडब्रेकर्स बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिकेचे
यासंदर्भात पी. व्ही. स्नेहा यांची भेट घेतली असता स्पीड रोखण्यासाठी स्पीडब्रेकर्स आवश्यक आहेत. मात्र, स्पीडब्रेकर्स बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका यांचे आहे. तेथे जर सातत्याने अपघात घडत असतील तर पोलीस खाते या दोन्ही खात्यांच्या अधिकाऱ्यांना तशी कल्पना निश्चितपणे देते. भरधाव वेगाने वाहने चालवू नयेत. हेल्मेटशिवाय वाहन चालवू नये. सायलेन्सरचा आवाज करू नये, यासाठी वाहतूक पोलीस खाते सतत लक्ष ठेवून आहे. प्रामुख्याने तरुण विद्यार्थी हेल्मेटशिवाय जात असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाते. वाहतूक पोलीस खात्याच्या सततच्या प्रयत्नांमुळे आता हे प्रकार बऱ्यापैकी कमी झाले आहेत.
पी. व्ही. स्नेहा (गुन्हे तपास व वाहतूक पोलीस उपायुक्त)
वाहतूक नियमांचे पालन आवश्यक : एसीपी गंगाधर
शहरामध्ये वाहनांची वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढली आहे. वास्तविक प्रत्येक वाहनधारकाने नियमांचे पालन केल्यास अपघात होण्याचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल. परंतु, तसे होत नाही. दुर्दैवाने लोकसंख्या आणि वाहनांची संख्या या तुलनेमध्ये वाहतूक पोलीस स्टेशन्सची संख्या कमी आहे. 2014 मध्ये बेळगाव पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आले. तेव्हापासून दोन पोलीस स्टेशन्सच वाहतुकीचा कार्यभार सांभाळतात. बेळगावसारख्या अतिवर्दळ वाढलेल्या शहरासाठी आणखी दोन वाहतूक पोलीस स्टेशन्सची गरज आहे. या सर्व वर्दळीवर, गर्दीवर एकच उपाय आहे तो रिंगरोडचा. जेणेकरून शहरातील सर्व वाहतूक त्या मार्गे वळविता येईल. परंतु, ते प्रत्यक्षात येण्यास अनेक अडचणी आहेत. सध्या तरी खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी 7 ते सकाळी 11.30 या वेळेत पिरनवाडीजवळ आम्ही अवजड वाहने थांबवत आहोत.
मुख्य रस्त्यावर स्पीडब्रेकर्स घालू नयेत : होकार-नकारांमध्ये अडकले स्पीडब्रेकर्स
स्पीडब्रेकर्स हे स्पीड कमी करण्यासाठी असतात, हे सांगण्याची गरज नाही. परंतु, दुर्दैवाने जनमानसामध्ये याबाबत फारशी माहिती नाही. वास्तविक मुख्य रस्त्यावर स्पीडब्रेकर्स घालू नयेत, असा नियम आहे. स्पीडब्रेकर्स घातल्यावर त्याच्यावर पांढरे पट्टे ओढणे आणि ‘कॅट आईज बोर्ड्स’ लावणे आवश्यक आहे. 40 मीटरआधी स्पीडब्रेकरची सूचना दिसायला हवी. मात्र, या नियमांचे फारसे पालन होत नाही. लक्षात घेण्याजोगी महत्त्वाची बाब म्हणजे स्पीडब्रेकर्स हवेत की नकोत? हे नागरिक ठरवतात, हे दुर्दैव! अनेक ठिकाणी प्रामुख्याने ग्रामीण भागात स्पीडब्रेकर्स घातले की लोकांचा जमाव आक्रमक होतो, दहशत निर्माण करतो. आमच्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होतो. पोलीस बंदोबस्तामध्ये जरी स्पीडब्रेकर्स घातले तरी आठ दिवसांत ते पुन्हा उखडले जातात. एकीकडे हे चित्र आहे तर दुसरीकडे स्पीडब्रेकर्स हवेत, म्हणून नागरिक आक्रमक होतात. रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या विक्रेत्यांना स्पीडब्रेकर्स हवे असतात. याचे कारण म्हणजे स्पीडब्रेकर्समुळे वाहनाचा वेग कमी झाला की साहजिकच विक्रेत्यांकडील उत्पादनांची विक्री होते, असा अनुभव आहे. अशा सर्व होकार-नकारांमध्ये स्पीडब्रेकर्स अडकले आहेत. स्पीडब्रेकर्स मुख्य रस्त्यावर म्हणजेच मेन रोडवर घालू नयेत, असा नियम आहे. परंतु, लोकांच्या मागणीमुळे बऱ्याचदा या नियमाला बाजूला ठेवावे लागते, हे वास्तव आहे.
आयआरसीने, वाहतूक पोलीस खात्याने वाहन चालविण्याबाबत अनेक नियम केले आहेत. पोलीस खाते अनेकदा नियम मोडल्यामुळे वाहनचालकांवर कारवाई करते. परंतु, नागरिकांची उदासीनता हेसुद्धा अपघात होण्याचे मुख्य कारण आहे. जेथे पोलीस नाहीत, याचा साधारण अंदाज असतो, अशा ठिकाणी तरुणवर्ग आणि आता मुलीसुद्धा सर्रास दुचाकीवरून ट्रिपल सीट जातात. दुचाकी चालवताना किंवा कोणतेही वाहन चालविताना मोबाईल वापरणे ही तर फॅशन झाल्यामुळे संभाव्य परिणामांची चिंता कोणालाच नाही. मद्यपान करून वाहन चालविले जातात. यामध्ये नियम मोडला जातो, याचे सोयरसुतक वाहनधारकांना नाही. काही वेळा समाजाच्या कोडगेपणाचा प्रत्यय येत असतो. कारण गर्दीच्या ठिकाणी एखादी रुग्णवाहिका आली असेल तर सर्वप्रथम त्या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्याचे औदार्य सहसा दिसत नाही. किंबहुना त्या रुग्णवाहिकेपाठोपाठ आपलेही वाहन सहज नेता येईल का? याच्याच प्रयत्नात वाहनधारक दिसतात.
जबाबदारी कोणाची?
प्रशासन आणि सरकार नियम सांगते. वाहतूक पोलीस कारवाईचा बडगा उगारते. तथापि, पालक आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे? शाळांमध्ये शिक्षकांनी व घरी पालकांनी मुलांना वाहतुकीचे नियम समजावून देणे ही काळाची गरज आहे. मुळात मुले आपले अनुकरण करतात, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. कोणत्याही परिस्थितीत मद्यपान करून आपला मुलगा किंवा मुलगी वाहन चालविणार नाही, यासाठी साम दाम दंड भेद यांचा उपयोग पालकांनी करायला हवा. कोणाच्याही दुर्लक्षामुळे किंवा चुकीमुळे एक जीव हकनाक जातो आणि ते घर अखेरपर्यंत त्या वेदनेचा सल उरी बाळगते. हे टाळायचे असल्यास ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा…’ हे लक्षात ठेवूनच नियमांचे पालन करून वाहन चालविणे उचित ठरेल.
ट्रिपल सीट, विनाहेल्मेट व ड्रंक अँड ड्राईव्हचे गुन्हे
- वर्ष ट्रिपल सीट विनाहेल्मेट मद्यपान करून वाहन चालविणे
- (ड्रंक अँड ड्राईव्ह)
- 2021 1471 120286 69
- 2022 3059 133199 195
- 2023 671 8570 (जूनअखेर) 174 (जूनअखेर)









