वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जेतेपदासाठी झालेल्या लढती सुमितने स्वर्सिनावर 6-4, 7-5 अशी मात केली. त्याचे हे आजवरचे चौथे एटीपी चॅलेंजर जेतेपद असून या वर्षातील दुसरे जेतेपद आहे. याआधी एप्रिलमध्ये त्याने रोममध्ये झालैल्या गार्डन ओपन स्पर्धेतही अजिंक्यपद पटकावले होते.
या अंतिम लढतीत सुमितला स्वर्सिनाकडून कडवा प्रतिकार झाला. स्वर्सिनाने झटपट 3-0 अशी आघाडी घेत नंतर ती 4-1 अशी केली. यानंतर मात्र सुमितने नियंत्रण मिळवित मुसंडी मारली आणि हा सेट 6-4 असा घेत आघाडी घेतली. सातवे मानांकन मिळालेल्या सुमितने दुसऱ्या सेटमध्ये हा जोम कायम राखत 4-1 अशी आघाडी घेतली. मात्र पाचव्या मानांकित स्वर्सिनाने चतुराईने खेळ करीत कडवी टक्कर दिली. पण सुमितने अजिबात विचलीत न होता आपला खेळ उंचावला आणि 5-3 अशी बढत घेतली. स्वर्सिनानेही संघर्ष करीत त्याला 5-5 वर गाठले तेव्हा हा सामना तिसऱ्या सेटपर्यंत लांबणार असे वाटले होते. पण सुमितने सर्व्हिस भेदत 6-5 अशी आघाडी घेतली. शेवटच्या गुणासाठी स्वर्सिनाने सुमितला संघर्ष करायला भाग पाडले. त्याने तीनदा मॅचपॉईंट्स वाचवले. पण चौथ्यावर सुमितने सामना संपवला. सुमारे पावणेदोन तास ही लढत रंगली होती.