इर्षाळगडच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र ईर्षाळगडची दुर्घटना होण्याआधी भारतीय हवामान विभागाच्या ‘सतर्क’ या अॅपने त्याबाबतचा इशारा आदल्या दिवशी दिला होता. आता त्याच ‘सतर्क’ने गोवा राज्यासह महाराष्ट्रतील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यात दरड कोसळण्याचा इशारा दिला आहे.
इर्षाळगडची आपत्ती येण्यापुर्वी भारतीय हवामान विभागाने विकसित केलेले सतर्क या अॅपने त्यासंबंधीत इशारा त्या परिसरातील नागरिकांना दिला होता. त्यानंतर आता पुन्हा हे अॅप चर्चेत आले असून या अॅपच्या माहीतीनुसार गोवा राज्यासह महाराष्ट्रतील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यात डोंगरावरून दरड कोसळणे, दगड माती वाहून येणे, झाडे भिंती पडणे, रस्ते खचणे, पाणी साचणे किंवा फ्लॅश फ्लड होणे अशा घटना घडणार असल्याचा इशारा दिला आहे.
त्याचबरोबर दरड प्रवण क्षेत्र असल्याची नावे देखील सतर्कने जाहीर केली आहे. आंबा, भुईबावडा, गगनबावडा, करूळ, फोंडा आंबोली, तिलारी, चोरला, सावंतवाडी, पोमेंडी, मायणेवाडी, देवळी, बिलवास, मसुरे, आमरड, पेडणे, पारगड, नामखोल, ऐनी, चंदगड या भागात दरड कोसळण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.तसेच मोठा पाऊस सुरू असताना घाट रस्त्यांवरून प्रवास टाळावा आणि धबधब्याच्या ठिकाणी थांबू नये अशा पद्धतीचा आवाहन देखील सतर्कने केले आहे