कागल / प्रतिनिधी
भुदरगड, राधानगरीसह जिल्ह्यात सर्वत्रच अतिवृष्टी होत आहे.त्यामुळे पंचगंगा दुधगंगा वेदगंगा यासह सर्वच नद्या पाञाबाहेर पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी.तसेच, पुराचे पाणी गावात शिरणार्या कुटुंबियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. यासाठी प्रशासनही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.त्याला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
दरम्यान, अनेक लहान बंधार्यासह मोठे पुलही पाण्याखाली जात आहेत.तर अनेक मार्गावर पाणी आले आहे.त्यामुळे अशा ठिकाणी धोका पत्करून नागरिकांनी पाण्यातून जाण्याचे धाडस करु नये. असे आवाहनही मंञी मुश्रीफ यांनी केले आहे.