संसदेत सरकार मणिपूर प्रश्नावर चर्चेला तयार झाल्यावरही विरोधक मागे सरले, विरोधकांना केवळ राजकारण करायचे असल्याचे मत भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. तसेच किरिट सोमय्या प्रकरणात महिलांनी पुढे येणे गरजेच असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्या आज कोल्हापूरात बोलत होत्या. राज्यभरात महिलांच्या सहकारी संस्था चालू करून त्यांच्या सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न सुरु असून कोल्हापूर शहरात 25 सहकारी संस्था सुरु केल्याची माहीतीही त्यांनी दिली.
कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या; “राज्यभरात महिला सेवा सहकारी संस्था सुरु केल्या आहेत. या निमित्तानी महिलांना सहकार क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. या संस्थांच्या माध्यमांतून शासकीय स्तरावरील कामं आता महिलांना घेता येणार आहेत. आणि या उपक्रमाची सुरुवात आम्ही कोल्हापूरमधून सुरवात करत आहे.” अशी माहीती त्यांनी दिली.
मणिपूरच्या घटनेवर भाष्य करताना त्या म्हणाल्या, “मणिपूरमध्ये जे काही घडले आहे त्याचा मी निषेध करते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाष्य केलं आहे. पण विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे. सरकार संसदेमध्ये चर्चेला तयार झाल्यानंतर विरोधक मागे सरले. कारण राहुल गांधी हे संसदेत नाहीत त्यामुळे याच राजकारण केलं जातंय. विरोधक मणिपूरबरोबर इतर ठिकाणी घडलेल्या घटनेवर विरोधक बोलत नाहीत.”असाही सवाल त्यांनी विरोधकांना केला आहे.
किरिट सोमय्या प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्या, “जो प्रकार झाला तो चुकीचा झालाच आहे. किरीट सोमय्याप्रकरणी कुणी ताई समोर आली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी हाऊसमध्ये याबाबत आश्वासन दिलं आहे.” असेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी सरकारमध्ये सामिल झाल्यावर त्या म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे झालं ते नवीन नाही. ते होणारच होतं. पण कधी होणार हे माहीत नव्हतं. आम्ही अजितदादा यांचं अभिनंदन करून स्वागत केले आहे. त्याचबरोबर रुपाली चाकणकर आणि माझं काही बांधाला बांध नाही. जिथं गोष्टी मनाला पटत नाही तिथं आम्ही बोलून दाखवू” असेही त्या म्हणाल्या.








