सावंतवाडी : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे दोन दिवस शाळा बंद असल्यामुळे जि . प. पूर्ण प्राथमिक शाळा नेमळे नं .1 मधील दुसरीच्या वर्गात कवड्या जातीचा बिन विषारी साप मुलांना दिसला. दोन दिवसाच्या सुट्टीनंतर शनिवारी सकाळी शाळा सुरु झाल्यावर दुसरीच्या विद्यार्थ्यांना कवड्या जातीचा साप दृष्टीस पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता गावकर यांनी नेमळेतील सर्प मित्र ओंकार गावडे यांना लगेच फोन करून वर्गात मण्यार असल्याचे सांगितले. लगेच सर्पमित्र गावडे यांनी शाळेत येऊन मण्यारीला पकडून जे्रबंद केले. यावेळी सर्प मित्र ओंकार गावडे यांनी शाळेतील मुलांना विषारी, बिनविषारी वेगवेगळ्या जातीच्या सापाविषयीं माहिती दिली. तसेच आता वर्गात पकडलेली मण्यार नसून बिनविषारी कवड्या जातीचा मण्यारी सारखा दिसणारा साप आहे. शाळेत आलेल्या कवडया जातीच्या सापाला सुरक्षित पकडल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यपिका सुनीता गांवकर यांनी सर्प मित्र ओंकार गावडे यांचे आभार मानले आहेत. यावेळी शाळेच्या शिक्षिका श्रेया परब, चंद्रकला भोसले, करपे गुरुजी उपस्थित होते.