पावसाचा जोर वाढत असताना कोल्हापूर जिल्हापरिषदेच्या शाळेतील अत्यंत दयनिय स्थिती समोर आली आहे. राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडीतील गावातील विद्यार्ध्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत असल्याचे समोर आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी या गावात विद्यार्थ्य़ांच्या गैरसोईबद्दलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत एका जून्या आणि गळती लागलेल्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
चक्रेश्वरवाडीच्य़ा शाळेची कौलारू आणि जून्या बांधणीची असून ती तीचे छत कुमकुवत झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेच्या छतावरील बरीच कौले गाय़ब आहेत. त्यामुळे पाउस सुरु झाल्यावर पावसाचे पाणी सरळ विद्यार्थ्यांच्या अंगावर पडत आहे. त्यामुळे शाळेत बसताना विद्य़ार्थ्यांना छत्री उघडूनच बसावे लागत आहे. तसेच, तसेच शाळेत सगळीकडे ओलावा असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. शाळेच्या या परिस्थितीमुळे पालकवर्गातून संताप व्यक्त होत असून शाळेसाठी नविन इमारतीची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.