सांगली, शिराळा : प्रतिनिधी
जिल्ह्यात पावसाची रिमझीम तर एकटा शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुवांधार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात गतीने वाढ होऊ लागली आहे. धरणातील साठ्यात वाढ होऊ लागल्याने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान सांगली शहरात कृष्णा नदीतील पाणीपातळीही ९.९ फुटापर्यंत उतरली आहे.
कोयना धरण परिसरात गेल्या ४८ तासात १६५ आणि वारणा धरण परिसरात ९६ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे कोयनेचा साठा दिवसात दोन टीएमसी वाढून ४४.१४ वरुन 46.76 तर वारणेचा साठा २२.७४ टीएमसी वरून एक टीएमसी वाढून 23.84 झाला आहे. महाबळेश्वरमध्ये चोवीस तासात १८० आणि नवजामध्ये २०५ मिमी पाऊस काल झाला होता. आज सांगली पाटबंधारे विभाग पूर नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार कोयनानगर येथे 158 मिलिमीटर, नवजा येथे १९४ मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 146 मिलिमीटर पाऊस झाला आहे. 41 हजार 919 क्युसेक गतीने कोयनेची पाण्याचे आवक आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी सकाळी आठ वाजता असलेली पाणीपातळी पुढील प्रमाणे –
पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/14’00”
2)भिलवडी पूल – (53)/13’7″
3)आयर्विन- (45)/10’09”
4)राजापूर बंधारा-(58)/30’01”
5) राजाराम बंधारा-(43)/37’1″
पाणीसाठा (TMC)/ विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- *
2) आयर्विन पूल – 13385
3) राजापूर बंधारा-72208
4) राजाराम बंधारा -42688
5) कोयना धरण- 46.76 TMC/0
6) वारणा धरण- 23.84 TMC /916
7)अलमट्टी धरण- 53.249 TMC
आवक – 107769
जावक- 6671
मांगले सावर्डे धरण पाण्याखाली
दरम्यान शिराळा तालुक्यातील पावसाने मांगले सावर्डे धरण पाण्याखाली गेले आहे. यामुळे कोणतीही हानी झाली नसून पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आले आहे.








