पाकिस्तानात पुन्हा न जाण्याचीही हमी, सीमा हैदरचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे मदतीचे आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, नोएडा
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत रोज नवनवीन खुलासे झाल्यानंतर तिने राष्ट्रपतींकडे दाद मागितल्याचेही स्पष्ट झाले आहे. सीमा हैदरच्या वतीने राष्ट्रपती भवनाकडे सहाय्यता अर्ज पाठवण्यात आला आहे. या अर्जावर सीमा हैदरची स्वाक्षरी असून नोएडातील पत्ता नोंदवलेला आहे.
सीमा हैदरची उत्तर प्रदेश एटीएसने दोन दिवस चौकशी केल्यानंतर सीमावर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार पडू शकते. एटीएसने सीमेवरून पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयशी असलेल्या संबंधांवर प्रŽचिन्ह उपस्थित केले होते. याचदरम्यान सीमाने आता मदतीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दाद मागितली आहे. सीमा आणि सचिनच्या विवाहाचे छायाचित्रही समोर आले आहे. यामध्ये दोघांच्या गळ्यात माळा दिसत असून दोघांनी नेपाळमधील एका मंदिरात लग्न केल्यानंतर भारतात प्रवेश केला होता.
काही मुद्द्यांवर अजूनही संशय
उत्तर प्रदेश पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सीमाकडे आतापर्यंत केलेल्या चौकशीच्या आधारे ती पाकिस्तानी गुप्तहेर आहे असे म्हणता येणार नाही. मात्र, काही प्रश्नांच्या उत्तराबाबत एटीएस समाधानी नाही. त्यानंतर सीमेपलीकडेही तिची चौकशी केली जाऊ शकते. सीमाबरोबरच तिचा प्रियकर सचिनचीही चौकशी करण्यात येत आहे. सीमाला लवकरच पाकिस्तानात पाठवले जाऊ शकते, असेही बोलले जात आहे. मात्र, तिला पाकिस्तानात जायचे नसून आपल्याला भारतातच राहायचेय, असे तिने राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्रातही म्हटले आहे. यासंबंधी उल्लेख करताना आपल्याला पाकिस्तानात पाठवले तर मी वाचू शकणार नाही, असा दावाही तिने केला आहे.
सीमाची प्रकृती बिघडली
पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर या महिलेची प्रकृती खालावली आहे. तिला डिहायड्रेशनचा त्रास होत आहे. तपास पथकांकडून झालेल्या चौकशीनंतर सीमा गुऊवारी रबुपुरा येथील घरी परतली. त्यानंतर शनिवारी तिची तब्येत अचानक बिघडली. तसेच सचिनची प्रकृतीही खालावली आहे. दोघांवरही सध्या घरीच उपचार केल्याचे समजते.









