Sadabhau Khot : राज्य सरकारने गाईच्या दुधाला 3/5 फॅट आणि 8/5 SNF ला 34 रुपये एवढा दर निश्चित केला. त्याप्रमाणे दरपत्रक देखील जाहीर केलं आहे. परंतु काही खासगी दूध संघांनी 3/5 फॅट आणि 8/5 SNF च्या खाली ज्यांचे गुणप्रत असेल तर त्या दुधाला रिव्हर्स 1 रुपये ठेवलेला आहे. त्यामुळे राज्यातील काही खासगी दुध संघानी शेतकऱ्यांवर दरोडाच घातला आहे. ही गोष्ट तात्काळ दुग्धविकास मंत्री यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात आणून देणार आहोत तसेच अश्या पांढऱ्या दुधातील या काळ्या बोक्यांना आता चाफ बसावल्या शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
Previous Articleपीडितेला 19 महिन्यांत मिळाला न्याय!
Next Article महे-कसबा बीड पुलावर पाणी, वाहतूक बंद








